ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता लागू...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता लागू...!

प्रकाशन: 17 Nov 2022 11:06 AM
वाचन संख्या 41

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राज्यातले एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत, यादरम्यान आज राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. शिंदे-भाजप सरकारने हा निर्णय घेतला असून राज्य सरकारने एसटी महामंडळाला याबद्दलचे पत्र पाठवले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मागील काही काळापासून रखडला होता. या प्रस्तावित भत्त्यावर निर्णय होत नसल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या तसेच त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यां मात्र २८ टक्के भत्त्यावर समाधान मानावे लागत होते. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स