खासदार विनायक राऊत यांनी केले परब कुटुंबीयांचे सांत्वन…!
श्रावण | गणेश चव्हाण : आचरा गावचे प्रतिष्ठित उद्योजक व शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विनायक परब यांच्या डाॅ. विशाल परब या तरुण मुलाचे अकाली निधन झाल्याने, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी, चुनवरे येथे परब यांच्या मुळ गांवी भेट देत, परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. विनायक परब यांचा मुलगा डॉ. विशाल विनायक परब वय ३८ वर्ष यांचे ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई गोरेगांव येथे हाॅस्पीटल चालवणार्या डाॅ परब यांचा ४ नोव्हेंबरला जन्मदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी, आचरा येथे घरी आले होते. सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी डाॅ. विशाल परब यांच्यावर नियतीचा घाला आला. निधनाची बातमी कळताच, खासदार विनायक राऊत यांनी विनायक परब यांच्या मूळ गावी चुनवरे येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर, दीपक उर्फ बंडू चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)