ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी.

प्रकाशन: 17 Nov 2022 09:58 AM
वाचन संख्या 63

कातकरी समाजातील महिलांना साड्या व पुरुषांना ब्लॅंकेटचे वाटप.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अर्थात “राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस” साजरा केला . तालुका कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वेंगुर्ले शहरातील कॅम्प येथील कातकरी समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन महिलांना साड्या व पुरुषांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणजे देशातील १२ कोटी अनुसूचित जनजाती समाजाच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि भारतीय इतिहासात जनजाती बांधवांच्या गौरवशाली, शौर्यशाली आणि तेजस्वी पराक्रमाच्या योगदानाची सुवर्ण अक्षरांनी दखल घेणारा अविस्मरणीय असा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.जननायक क्रांतीसुर्य बिसरा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील उलीहातु येथे झाला. आदिवासी समाजामध्ये मोठी क्रांती घडविण्यासाठी बिरसा मुंडा यांचें नांव घेतलं जाते. आदिवासी समाजाच्या “उलगुलान” आंदोलनाचे ते जनक होते. बिसरा मुंडा यांना “धरतीबाबा” म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी समाजात केलेली जनजागृती आणि व्यापक मानवसेवेमुळे आजही असे धरतीबाबा मिळावेत अशी प्रार्थना संपुर्ण देशात केली जाते. म्हणून आदिवासी भागांमध्ये क्रांतीकारी बिसरा मुंडा ईश्वरासमान पुजले जातात.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड.सुषमा खानोलकर, महीला मोर्चा ता.अध्यक्षा स्मिता दामले, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब, माजी नगराध्यक्षा डॉ.पुजा कर्पे, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, युवा मोर्चाचे नारायण कुंभार व पींटु सावंत, सोशल मीडियाचे अमेय धुरी, बुथ अध्यक्ष सुधीर पालयेकर व पुंडलिक हळदणकर, नगरसेवीका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, माजी सरपंच समीधा कुडाळकर, ग्रा.पं.सदस्या लक्ष्मी परब, रिमा मेस्त्री, सावरी शेलटे, नंदिनी आरोलकर, रसीका मठकर, आकांक्षा परब, मानसी परब, कृष्णा हळदणकर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स