ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के !

मुणगे कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के !

प्रकाशन: 03 Aug 2021 07:23 PM
वाचन संख्या 144

मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हाय. आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस या प्रशालेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, अकौंटिंग , इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या तीन शाखां मधून तीस विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रथम क्रमांक सायली संजय घाडी. (८०.६६%), द्वितीय क्रमांक अनिकेत सुनिल चिंदरकर. (८०.३३%) तर तृतीय क्रमांक
कविता मनोहर मुणगेकर. (७१.३३%) हिने पटकावला. दोन विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता तर बारा विध्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, संस्था व्यवस्थापक आबा पुजारे, प्र. मुख्याध्यापक प्रसाद बागवे यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स