ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान शोध मासिकाचे विमोचन

कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान शोध मासिकाचे विमोचन

प्रकाशन: 03 Aug 2021 07:33 PM
वाचन संख्या 72

लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

कणकवली / उमेश परब : शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली काँलेज कणकवली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.प्राचार्य डॉ. प्रा. राजेंद्र कुमार चौगुले यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा फोंडाघाट येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बालाजी सुरवसे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते या प्रसंगी सामाजिक विज्ञान मंडळाच्या आंतरराष्ट्रीय शोध मासिक विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, प्राध्यापकांनी संशोधन पेपर तयार करून सामाजिक समस्यांचा शोध घेतला पाहिजे.
प्रा. सोमनाथ कदम यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यांचा थोडक्यात आढावा घेतला तर प्रा.सीमा हडकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.
प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना दोन्ही महामानवांच्या कार्याचा आढावा घेतला. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नऊ साहित्यकृतींवर आधारित निर्माण झाले.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात वंचित समाजाचे वर्णन असून शेतकरी, कामगार यांचे प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी मांडले आहेत.तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रीय कार्याला तोड नाही. लोकमान्य टिळकांचे कार्य हे आजही राष्ट्रप्रेम जागृत करणारे आहे’असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.युवराज महालिंगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. बी.एल. राठोड यांनी केले.तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स