ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
परब मराठा समाजातर्फे १९ नोव्हेंबरला बालदिन सोहळा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

परब मराठा समाजातर्फे १९ नोव्हेंबरला बालदिन सोहळा..!

प्रकाशन: 14 Nov 2022 10:35 AM
वाचन संख्या 33

मसुरे | प्रतिनिधी :

परब मराठा समाज, मुंबई “महिला विभागाच्या” विद्यमाने बालदिन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० ते ९.०० या वेळेत अमर हिंद मंडळ, अमरवाडी, गोखले पथ (उत्तर), दादर, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.
या प्रसंगी ज्ञाती मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने संगीत, वेषभुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बडबड गीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. परब समाजातील इयत्ता १० वी परीक्षेत ७५ टक्के आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ७५ टक्के व पदवी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सन्मान होणार असून अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत समाजाच्या दादर येथील कार्यालयात सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत (रविवार व्यतिरिक्त) दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आणून द्यावीत.
अधिक माहितीसाठी सौ. प्रतिक्षा प्र. परब मो. ९८७०३३८४१८ किंवा श्री. शरद परब मो. ९८६९३९०७५४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परब मराठा समाज मुंबईच्या वतीने सरचिटणीस जि. एस. परब यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स