हळवल फाट्यावरील वळणावर अपघातांची मालिका सुरूच…!
गोव्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा टेम्पो पलटला.
चालक फरार ; एक ठार.
कणकवली I प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावर मालवाहतुक करणाऱ्या टेम्पोला हळवल फाट्यानजिक अपघात झाला. अपघातात एक जण जागीच ठार झाला. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आकाश महाजन (रा. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी.ए १२८२) घेऊन
कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जात होता.
हळवल तिठा येथे हा टेम्पो डाव्या बाजूला पलटी झाला. यात क्लीनर शुभम झोंजाळ (रा. कळे, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला.
अपघानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तातडीने महामार्ग पोलिस अधिकारी अरुण जाधव यांच्यासह त्यांचे पथक तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो हलवून अडकलेल्या शुभम झोंजाळ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघात घडल्यानंतर चालक आकाश महाजन हा घटनास्थळावरून पळून गेला होता. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)