रोणापाल माऊली मंदिरात दिपोत्सव संपन्न...!
बांदा | राकेश परब :
त्रिपुरारी पौणिर्मेनिमित्त रोणापाल येथील माऊली मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरासह आवारातही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. यावेळी देवीची आरती व पालखी प्रदक्षिणा सोहळाही संपन्न झाला. यावेळी शेकडो भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला. ढोलताशांसह श्रींची पालखी काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विद्युत रोषणाई व दीप प्रज्वलनामुळे मंदिर परिसराला आकर्षक स्वरुप प्राप्त झाले होते. या सोहळ्यात देवस्थान मानकरी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)