पतंजली योग समिती सह जिल्हा प्रभारीपदी श्री. शेखर बांदेकर यांची निवड..!
बांदा | राकेश परब :
बांदा येथील पतंजली योग समितीचे कक्षाप्रमुख शेखर बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती सह जिल्हा प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल बांदा येथे योग वर्गामध्ये त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती यांची सावंतवाडी नगरपरिषद सभागृहमध्ये जिल्हा स्तरीय सभा संपन्न झाली या सभेला भारत स्वाभिमान महाराष्ट्र राज्य प्रभारी बापूजी पडाळकर,पतंजली योगसमिती महाराष्ट्र राज्य प्रभारी शेखर खापणे,सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी महेश भाट,तुळशीदास रावराणे,विद्याधर पाटणकर ,राबजी परब ,प्रकाश रेडकर आदि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. योगाभ्यास करणे आणि योगाचा प्रसार, प्रचार करण्याकरिता शेखर बांदेकर हे सतत कार्यरत असून त्यांची कार्याची दखल घेऊन पतंजली योग समिती सहजिल्हा प्रभारी पदी झाल्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस संपूर्ण बांदा योग साधक वर्गातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या यावेळीवेळेस संजय नाईक, विकास केरकर, लक्ष्मण पावसकर , नंदू महाजन,अंकिता चिंदरकर, प्रियांका महाजन, राजश्री तेंडले यासह बांदा पतंजली योगवर्गाचे योगसाधक उपस्थित होते. आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे दररोज सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत योगवर्ग नियमित चालू असत़ो. शेखर बांदेकर यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)