कुवळे सोसायटीचे सचिव अरुण लाड यांचे निधन
संतोष साळसकर / शिरगाव : देवगड तालुक्यातील कुवळे-तांबळवाडी येथील रहिवासी तथा कुवळे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सचिव अरुण राजाराम लाड(५७) यांचे १४ सप्टें.रोजी रात्रौ ९.३० वा. हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,३भाऊ,एक बहीण असा परिवार आहे.त्यांचा हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.कुवळे सोसायटीमध्ये शेतकरीवर्गासाठी त्यांनी चांगल्याप्रकारे काम केले. त्यांच्या अंत्ययात्रेला समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित होते.त्यांच्या या अकाली जाण्याने कुवळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)