ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदळे येथील श्री काळभैरव मंदिर जयंती उत्सव आणि देव दीपावली वार्षिक उत्सव १५ नोव्हेंबर पासून…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदळे येथील श्री काळभैरव मंदिर जयंती उत्सव आणि देव दीपावली वार्षिक उत्सव १५ नोव्हेंबर पासून…!

प्रकाशन: 11 Nov 2022 05:09 PM
वाचन संख्या 51

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील श्री काळभैरव जयंती उत्सव २०२२ हा कार्यक्रम दिनांक १५ नोव्हेंबर व दिनांक १६ नोव्हेंबरला सुरू होत आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून ते दुपारी १२ वाजता पर्यंत लघुरुद्र जप, रात्रौ ९.३० वाजता कलारंग संगीत रजनी हिंदळे यांचा भावगीत, भक्तीगीत व नाट्यगीत कार्यक्रम. बुधवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. पासून ते दुपारी १ वाजता पर्यंत लघुरुद्र स्वाहाकार. दुपारी १ वाजता ते ३.३० पर्यंत महाप्रसाद दुपारी १वाजताा ते सायंकाळी ७.३० पर्यंत स्थानिक बुवांची भजने. रात्रौ १० वाजता किर्तन जुगलबंदी. सादरकर्ते : किर्तनचंद्र श्री. श्रेयस बडवे आणि किर्तनचंद्रीका सौ. मानसी बडवे (पुणे), साथसंगत संवादीनी हर्षल काटदरे (चिपळूण) तबला : सोहम जोशी (दापोली) सादर होणार आहेत.
तसेच देव दीपावली वार्षिक महोत्सव दि. १९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर रोजी संध्या. डाळप इ. रात्रौ पुराण वाचन पालखी व त्यानंतर किर्तन किर्तनकार ह.भ.प. निलेश पाटकर (कोटकामते), गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी, पहाटे ५ वाजता ते सायंकाळी ७ वाजता दर्शन व ओटी भरणे कार्यक्रम. संध्याकाळी ७ वाजता उत्सवाची सांगता होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी दोन्ही उत्सवांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री काळभैरव मंदिर देवस्थान कमिटी, हिंदळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स