ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांद्यात श्री विठ्ठल मंदिर काकड आरतीची सांगता....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांद्यात श्री विठ्ठल मंदिर काकड आरतीची सांगता....!

प्रकाशन: 11 Nov 2022 05:16 PM
वाचन संख्या 33

बांदा | राकेश परब :
बांदा य़ेथिल श्री विठ्ठल मंदिरात दिवाळी पाडव्यापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सुरु असलेल्या काकड आरती सोहऴ्याची मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सांगता सोहळ्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.


दररोज पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात भूपाळी गायन करुन हा सोहळा आरंभ होतो. काकडा ज्योतीने श्री विठ्ठल रखुमाईला ओवाळले जाते. त्यानंतर पंचांमृत महाभिषेक करुन भजन व महाआरती करण्यात येते.या वर्षी मंदिरातील लाईट बंद करुन केवळ पणत्या व काकडा ज्योतीच्या तेजात केलेली आरती भाविकांसाठी संस्मरणिय ठरली. काकडआरती सोहळा कालावधीत ४ रोजी श्री विठोबाचा जत्रोत्सव व ६ रोजी तुलसी विवाह साजरा झाला. मंगळवारी गोपाळकाला होऊन या संपुर्ण सोहळ्याची सांगता झाली. चौदा दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यात अबालवृद्ध ग्रामस्थ ,महीलावर्गासह शेकडो भाविक दररोज नित्यनेमाने सहभागी होत असत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स