ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्लेत विश्व हिंदू परिषद हितचिंतक अभियान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्लेत विश्व हिंदू परिषद हितचिंतक अभियान.

प्रकाशन: 11 Nov 2022 03:13 PM
वाचन संख्या 60

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू हितचिंतक अभियानाचा शुभारंभ ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांच्या शुभहस्ते विठ्ठल मंदिर, वेंगुर्ले येथे वारकरी संप्रदायाच्या मंडळी सोबत करण्यात आला. यावेळी श्री.देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र परब यांच्या हस्ते सावळाराम कुर्ले बुवांचा पंढरपुरची अखंड वारी करीत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
संपूर्ण देशभर विश्व हिंदू परिषदेने ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत “हिंदू हितचिंतक अभियान” आयोजित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यांमध्ये वारकरी संप्रदायाच्या मंडळी सोबत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंढरपुरची कार्तिकी वारी करुन आलेल्या वारकरयांचा सन्मान विश्व हिंदू परिषद, प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णु खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर गुरुजींनी हिंदुंनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ले प्रखंड प्रमुख अरुण गोगटे, प्रखंड मंत्री आप्पा धोंड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक बाबुराव खवणेकर सर, कार्यवाह मंदारजी बागलकर, बजरंग दलाचे भुषण पेठे, भाजपचे शरदजी चव्हाण, प्रसंन्ना देसाई, वि. ही.प.चे महादेव ( भाऊ ) केरकर, महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकर, रा.स्व.संघाचे विजय वाडकर, हिंदुधर्माभिमानी – स्मिता मांजरेकर, मृण्मयी केरकर , प्रीती चव्हाण , शालीनी चीपकर, स्वप्नाली धोंड,
ओंकार चव्हाण, वारकरी संप्रदायाचे —- किशोर रेवणकर, गजानन कुबल, दिगंबर कुबल, रघुवीर पेडणेकर, रमाबाई तांडेल, शारदा तांडेल, प्रमीला टाककर, सहदेव गिरप, दिपाली कुबल, चित्रा केरकर, देवयानी केरकर, दाजी सावंत, सहदेव गिरप, सुजाता भुते, सावित्री तारी, अश्विनी गिरप, सुगंधा बांदेकर, चंदन कुर्ले, पांडुरंग मोंडकर, शामसुंदर रेवणकर, विठ्ठल वेंगुर्लेकर, अपर्णा सातार्डेकर, चंद्रभागा मेस्त्री, संध्या भोगवेकर, शाम आरोलकर, अंकुश वराडकर, दुर्गा कुबल, लक्ष्मी तांडेल, बाबली राऊळ, शुभांगी केळुसकर इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स