ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सक्षमीकरणासोबत विकासही गरजेचा : आमदार नितेश राणे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सक्षमीकरणासोबत विकासही गरजेचा : आमदार नितेश राणे.

प्रकाशन: 11 Nov 2022 02:19 PM
वाचन संख्या 110

आमदार नितेश राणे यांनी शिरगांवमध्ये केली मार्गदर्शनासोबतच केली निखळ चर्चा..

संदीप धोपटे यांचा भाजपा प्रवेश..

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : कुठल्याही निवडणुका ही शत्रुत्वाची लढाई नसते तर जनतेच्या प्रगतीसाठी त्या निवडणुका आपापल्या परीने
जिद्दीने जिंकण्यासाठीच लढावयाच्या असतात. आपल्याकडेच असल्याचा आभास निर्माण करून विरोधकांना फितूर झालेल्या हेरांना वेळीच ओळखून त्यांच्या हालचालींवर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते, असे मार्गदर्शन आमदार नितेश राणे यांनी शिरगांव येथे केले.

या दरम्यान संदीप धोपटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई परेल डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर या दोन्ही संस्थांचे संचालक संदीप धोपटे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सक्षमीकरणाबरोबरच विकास होणे गरजेचे आहे. बुथ सक्षमीकरण अंतर्गत शिरगाव येथील बुथ क्रमांक ९५ मधील मतदार, कार्यकर्ते, ग्रामस्थ, पदाधिकारी यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व आहे. विधानसभेच्या गामपंचायत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

बुथ कामांवरही लक्ष देणे गरजेचे आहे. शिल्लक राहिलेली विकास कामे सुचवून त्यांचा पाठपुरावा करा. निधी कमी पडू देणार नाही. मंजूर झालेली विकास कामे कंत्राटदारांकडून अधिक चांगल्या दर्जाची कशी होतील, याकडे लक्ष द्या. यावेळी ग्रामस्थ, मतदार यांनी केलेल्या सूचना, विविध मागण्या व विकास कामावर आमदारांशी दिलखुलास केलेली चर्चा

कार्यक्रमाला भाजप जिल्हा कमिटी कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, मंगेश लोके, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, शिरगाव विभागीय अध्यक्ष राजेंद्र शेटये, तालुका कार्यकारिणी सदस्य संतोषकुमार फाटक, बुथ अध्यक्ष विशाल कुवळेकर, ग्रामपंचायत सदस्या स्वाती साटम, माजी गटविकास अधिकारी आर. जी. सावंत, माजी सोसायटी अध्यक्ष एकनाथ तावडे, राजाराम साटम, शरद साटम, शैलेंद्र जाधव, विशाल साटम, सोसायटी संचालक संतोष तावडे आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांनी एखाद्या कुटुंब प्रमुखाच्या नात्याने जबाबदार व खेखेळीमेळीच्या घेतलेल्या या मार्गदर्शन बैठकीची सध्या देवगड सह सर्व जिल्ह्यातील तालुक्यात आदराने चर्चा होत आहे.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ (आपली सिंधुनगरी न्यूज)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स