ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर….!

प्रकाशन: 11 Nov 2022 11:17 AM
वाचन संख्या 30

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
महाराष्ट्रातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामध्ये कणकवली तालुक्यातील ६१ पैकी ५८ ग्रा.पं. चा समावेश आहे. कणकवली तालुका हा जिल्ह्यात राजकीय संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जात असल्याने जवळपास सर्वच ग्रा.पं. मध्ये रंगतदार लढती होणार आहेत. तर काही ग्रा.पं.मध्ये चुरशीची निवडणूक होणार असल्याने आतापासूनच राजकीय चर्चांना जोर चढला आहे. या निवडणुकीवर आगामी जि.प.,प.स. निवडणुकीची रंगीत तालिम होणार असल्याने त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सिंधुदुर्गात कणकवली तालुक्यामध्ये कोणतीही निवडणूक ही अतिशय चुरशीने आणि जोरदार राजकीय घडामोडीमधून होत असते. तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर व तोंडवली-बावशी अशा तीन ग्रा.पं. वगळता इतर ५८ ग्रा.पं.ची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये १७ सदस्य संख्या असलेल्या फोंडाघाट व कलमठ, १३ सदस्यसंख्या असलेली कासार्डे व ११ सदस्यसंख्या असलेली हरकुळबुद्रुक, कळसुली, नाटळ, नांदगाव, सांगवे व खारेपाटण अशा २६ ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चढाओढ पहायला मिळणार आहे. तर उरलेल्या ग्रा.पं.मध्येही तेवढ्याच ताकदीने कार्यकर्ते रिंगणात उतरणार आहेत.
तालुक्यातील इतर ग्रा.पं. मध्ये असलदे, आशिये, आयनल, भरणी, बिडवाडी, बोर्डवे, चिंचवली, डामरे, दारिस्ते, दारूम, दिगवळे, घोणसरी, हळवल, हरकुळखुर्द, हुंबरठ, जानवली, करंजे, कासरल, करूळ, कसवण-तळवडे, कोळोशी, कोंडये, कुंभवडे, कुरंगवणे-बेलें, लोरे, माईण, नडगिवे, नागवे, नरडवे, ओसरगाव, ओझरम, पिसेकामते, पियाळी, साकेडी, साळीस्ते, सांगवे, सातरल, शेर्पे, सावडाव, शिडवणे, शिरवल, शिवडाव, तळेरे, तरंदळे, तिवरे, वागदे, वाघेरी, वायंगणी, वरवडे, वारगाव अशा एकूण ५८ ग्रा.पं.ची निवडणूक जाहीर झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स