ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय डी.ए.ड संघटनेची स्थापना.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय डी.ए.ड संघटनेची स्थापना.

प्रकाशन: 10 Nov 2022 10:39 AM
वाचन संख्या 29

डी.ए.ड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्राथमिक उद्देश.

वैभववाडी | नवलराज काळे :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.ए.ड बेरोजगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हास्तरीय संघटनेची स्थापना.डी.एड/डी.टी.एड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग या नावाने ही संघटना असून कार्यकारणी पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष : विजय रामा फाले. (दोडामार्ग )
उपाध्यक्ष : स्वराली सुरज वाक्कर.( कुडाळ )
सचिव : सहदेव पाटकर. (कुडाळ )
सहसचिव : गौरी तातू आडेलकर. ( कुडाळ)
खजिनदार : नाना प्रदीप देसाई.(दोडामार्ग)
सल्लागार : तेजस तुकाराम देसाई.(दोडामार्ग)
सदस्य : गणपत ज्ञानेश्वर डांगी. (दोडामार्ग)
शिवप्रसाद दिपक नाटेकर. (दोडामार्ग )
श्रुती उदय तारी.(सावंतवाडी)
विलास जनार्दन जंगले.(सावंतवाडी )
सुरेश बाबू ताटे. (दोडामार्ग)
अमृता सुरेंद्र तेली. (कुडाळ)
देऊ एकनाथ धोंड. (वेंगुर्ला)
गौरवी गौरेश महाजन. (दोडामार्ग)
मिनल मधु कदम.(सावंतवाडी )
सोनाली राजेंद्र कोदे.(मालवण)
निलेश तीर्लोटकर. (देवगड)

सदर संघटना पुढील मुद्द्यावर लढा देणार आहे. स्थानिक पदविधारकांना प्राधान्य देउन पूर्वी प्रमाणे सेवा आयोजन कार्यालयामार्फत जिल्हा निवड मंडळ मार्फत स्थानिक पातळीवर डी.एड च्या मेरीट प्रमाणेच स्थानिकानमधूनच शिक्षक भरती करावी, टी.ई.टी परिक्षेत महाराष्ट्र राज्यात बोगस प्रमाणपत्रांचा मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे टी.ई.टी परीक्षा मारक आहे अशा बोगस परीक्षेवर आता कोणाचाही विश्वास राहिला नाही गेली दहा वर्ष फक्त ही परीक्षा घेऊन फक्त तिजोरीच भरली आहे त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेली TET ही अट रद्द करून जिल्हा पातळीवर एकच परीक्षा घेऊन किंवा पदविका मेरीटचा विचार करून स्थानिकांमधूनच शिक्षक भरती करावी, 0 ते http://localhost/news/public/uploads/20 पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद केल्यास शिक्षक भरती प्रक्रिया बंद होणार असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे आणि सहाजिकच त्याचा विपरीत परिणाम डी.एड पदविका पूर्ण केलेल्या, गेली दहा वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार युवक युवती यांच्यावर पडून ते देशो धडीला लागण्याची शक्यता आहे त्यामुळे गावातील वाडीवाडी मद्ये गेली कित्येक वर्ष असणाऱ्या मराठी शाळा बंद करून बालकांना शिक्षणापासून वंचित करू नये, जिल्हा परिषद गट-क संवर्ग सर्व पदांची भरती शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीमार्फत आहे पण शिक्षक हे पद गट-क वर्गात असूनही त्यातून वगळले आहेत. त्यामुळे शिक्षक पद त्यात समाविष्ट करून जिल्हा स्तरावर स्थानिकांमधुन भरती करण्यात यावी, सिंधुदुर्ग डोंगरी भागाचे निकष, बोलीभाषा आणि गुणवत्तेवर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून स्थानिकानमधूनच शिक्षक पदे भरण्यात यावी, गेली दहा वर्षे भरती न झाल्यामुळे स्थानिकांनधून भरती न केल्यास डी.एड पदविका शासनाला सुपुर्त केल्या जातील. अशा अनेक विषयांवर चर्चा करून पुढील काही दिवसांत न्याय मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स