वैभववाडी येथील होलसेल व्यापारी नामदेव भोवड यांचे निधन…!
वैभववाडी | नवलराज काळे :
वैभववाडीतील होलसेल व्यापारी नामदेव भोवड वय वर्षे ५७ यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात निधन झाले. चार दिवसापूर्वीच त्यांची बायपास सर्जरी झाली होती. आज सकाळपासून अचानक त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या निधनाने वैभववाडी शहारा सहित फोंडा गावामध्ये शोककळा पसरली आहे. कणकवली तालुक्यातील फोंडा हे त्यांचे मूळ गाव असून गेले अनेक वर्षापासून व्यापारासाठी वैभववाडी येथे स्थायीक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी २ मुलगे असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी वैभववाडी येथील स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची दुख:त घटना समजताच वैभववाडी, फोंडे, गगनबावडा येथील अनेक राजकीय, सामाजिक, व्यवसायिक क्षेत्रातील लोकांनी मुख दर्शनासाठी गर्दी केली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)