ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा भक्तीभावात साजरी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा भक्तीभावात साजरी..!

प्रकाशन: 08 Nov 2022 10:04 PM
वाचन संख्या 49

हजारो दिव्यांनी झाला दीपोत्सव साजरा ; फुलांची विशेष लक्षवेधी सजावट.

मसुरे | प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरी झाली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण असे महत्व आहे. या पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.


पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहीत मंदार व मोहनराव पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत स्वामींची काकड आरती संपन्न झाली,तद्नंतर स्वामी भक्तांच्या दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानच्या वतीने श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.
स्वामींच्या पालखीसह परगावाहून पायी चालत निघालेले स्वामीभक्त व अन्य स्वामीभक्त आज स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. पुणे, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, उस्मानाबाद, जेजुरी, सोलापूर, मुंबई इत्यादी ठिकाणांहून दिंडी व पालखी सोबत हजारो पदयात्री स्वामीभक्त श्रींच्या दर्शनाकरिता आले होते. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आलेल्या दिंडी व पालखीचे स्वागत व पूजन केले. तदनंतर या दिंडीसोबत आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी देवस्थानच्या भक्त निवास येथे महाप्रसादाचा लाभ घेतला.सर्व भाविकांची महाप्रसादाची सोय वटवृक्ष देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होऊन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांना शिस्तबद्ध रीतीने स्वामींचे दर्शन व्हावे या करीता बंदोबस्ताकरिता आलेले पोलीस कर्मचारी व समितीचे सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. येणारा भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वटवृक्ष मंदिराच्या दक्षिण महाद्वार लगत भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. भाविकांना मार्गदर्शन करण्याकरिता पोलीस बंदोबस्त व देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी तैनात होते. वृद्ध व विकलांग भाविकांना स्वतंत्र व्हीलचेअर वरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिरास आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हे सजावट सर्व स्वामी भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सायंकाळी ७ वाजता कार्तिक दिवा लावून हजारो दिव्यांच्या दीपप्रज्वलनाने दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, प्रा. शिवशरण अचलेर, गिरीश पवार, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, महादेव तेली, अविनाश क्षीरसागर, मनोज जाधव, महेश मस्कले, व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स