प्रमोद रावराणे यांना "वसंत स्मृती आदर्श संस्थाचालक पुरस्कार २०२२" प्रदान…!
वैभववाडी | नवलराज काळे : ठाणे येथे भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळा २०२२ च्या कार्यक्रमांमध्ये वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र श्री प्रमोद रावराणे यांचा वसंत स्मृती आदर्श संस्था चालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मंत्री रवींद्र चव्हाण आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकास पाटील, भाजपा शिक्षक आघाडीचे कोकण विभाग अध्यक्ष एन. एम .भामरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. रावराणे यांच्या या सन्मानामुळे वैभववाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रावराणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)