ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपची हनुमंतगड सफर..!
व्यायामाची जनजागृती करण्यासाठी उपक्रम.
मसुरे | प्रतिनिधी :
कट्टा येथील ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी हनुमंतगड सर करण्यात आला. सदर ग्रुप नेहमीच लोकांमध्ये व्यायामाची जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये सायकलिंग,रनिंग, चालणे असे उपक्रम घेतले जातात.
त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच गडकिल्ले आहेत.त्याची माहीती घेऊन दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंतगड सर करण्यात आला. ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी गडावर श्रमदान करत स्वच्छता अभियान राबविले.या उपक्रमाचे प्रमुख नियोजन डॉ जी.आर.सावंत यानी केले. यावेळी ब्युटीज ऑन व्हील्सचे सदस्य डॉ सोमनाथ परब, डॉ सुशील परब, निलेश झाट्ये, रुपेश भोजणे, श्री सावंत, बंडू माडये, निलेश हडकर, सुरेश कांबळी, प्रकाश सरमळकर, राजेश प्रभुलकर, गणेश पारकर, सोनू पारकर, सतीश कांबळी, दुर्गेश मडवळ,अमित सावंत, अनिल पाटील, नवनीत परब आदी सह सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)