चाफेड गावठण येथील जागृत ग्रामदैवत श्री गांगेश्वर रासाई मंदिरात ६ नोव्हेंबरला अखंड हरिनाम सप्ताह…!
शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील अतिशय पुरातनकालीन जागृत ग्रामदैवत श्री देव गांगेश्र्वर रासाई मंदिरात रविवार दिनांक ६ नोव्हेंबरला अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
ही दोन्ही मंदिरे गावच्या पूर्व दिशेला घनदाट वनराई वसलेली असून हा संपूर्ण परिसर अतिशय नयनरम्य आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची मने प्रसन्न होतात.तरी या अखंड हरिनाम सप्ताहाला सर्व भाविकांनी तसेच भजनी मेळे यांनी आपल्या भजनासह उपस्थित राहून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गांगेश्वर रासाई देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चाफेड यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)