माईण येथील जागृत ग्रामदैवत श्री माधवगिरी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबरला…!
शिरगांव | संतोष साळसकर : कणकवली तालुक्यातील माईण गावचे जागृत ग्रामदैवत श्री माधवगिरी देवाची वार्षिक जत्रा सोमवार दिनांक ७ नोव्हेंबरला होणार असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी दुपारी १ वाजता महाप्रसाद , रात्रौ १० वाजता टिपर पाजळने ,११ वाजता तरंग प्रदक्षिणा, १२वा.मान्यवरांचे सत्कार, व रात्रौ १. वाजता श्री चेंदवणकर गोरे दशावातरी नाट्य मंडळ संचालक सुधाकर दळवी यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती तर्फे करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)