पळसंब येथील बी.एस.एन.एल टॉवर नादुरुस्त..!
चिंदर | विवेक परब :
ग्रामपंचायत पळसंब कार्यक्षेत्रात भारत संचार निगम लिमिटेडचा टॉवर असून सध्या २ जी सेवा काही दिवस बंद आहे. वारंवार संबंधीताना फोन वरून विचारणा केल्यानंतर स्पेअरपार्ट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी या टॉवर चे नेटवर्क पण पोहचत नाही. या मुळे लोकांची गैरसोय होत आहे. तरी टॉवरची कार्यप्रणाली सुरळीत सुरु करण्यात यावी अशी मागणी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)