दिव्यांग बांधवांनी चित्राच्या माध्यमातून दिल्या आंतरराष्ट्रीय प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स दिनाच्या शुभेच्छा….!
मसुरे | प्रतिनिधी :
५ नोव्हेंबर हा दिवस इंटरनॅशनल प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स डे म्हणून ओळखला जातो. ‘ प्रॉस्थेटिक्स ‘ म्हणजे कृत्रिम अवयव आणि ‘ ऑर्थोटिक्स ‘ म्हणजेच सपोर्टिंग स्प्लिंट्स अर्थातच सहायक उपकरणे बनवण्याचे शास्त्र. “एम. जी. इम. इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स” तर्फे ‘ प्रथम इंटरनॅशनल प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स डे ‘ साजरा केला जात आहे.
सक्रियता आणि सशक्तीकरण हा यावेळचा विषय असून दिव्यांग बांधव आणि काही विद्यार्थ्यांनी मिळून यासंदर्भात अतिशय भव्य – दिव्य आणि सुंदर असे चित्र रेखाटले आहे. या वर्षीचा विषय आहे. दहा बाय तीस फूटाचे हे चित्र सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स ‘ हे क्षेत्र जागतिक स्तरावर सक्रियता दाखवून विस्तारीत आणि विकसीत होत आहे. ते फक्त मानव जातीपर्यंत सीमित राहिले नसून ते प्राणी आणि पक्षी यांच्या माध्यमातून चराचापर्यंत पोहोचले आहे, असा संदेश या चित्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी दिला आहे. अर्थातच दिव्यांग, चराचर हे आता त्यांच्या निष्क्रीयतेचे पाश तोडून वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम अवयव आणि सहायक उपकरणांच्या सहाय्याने सशक्त बनत असल्याचे या चित्रातून दिसत आहे.
प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स ‘ कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नाने आणि विविध संशोधनाने जगाचे आणि दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर आणि सुकर होते. यामुळे दिव्यांग बांधवांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या.
कामोठे, नवी मुंबई येथील ‘महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ही भारतातील पहिलीच डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. येथे ‘बॅचलर इन प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स ‘ हा ‘ भारतीय पुनर्वास परिषद ‘ या सरकारी संस्थेकडून मान्यता प्राप्त असलेला साडेचार वर्षांचा प्रोफेशनल डिग्री कोर्स सुरू करण्यात आला आहे.
संस्थेचे वैद्यकीय निर्देशक माननीय डॉ. सुधीर कदम, कुलगुरू डॉ. शशांक दळवी आणि उप कुलगुरू डॉ. नितीन कदम यांनी या संकल्पनेसाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. डॉ. सुमीत पाटील यांची ही संकल्पना असून डॉ. उत्तरा देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वात विद्यार्थ्यांनी हे चित्र साकारले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)