ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री रामराज्य रथयात्रेचे बांदा शहरात शनिवारी आगमन…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री रामराज्य रथयात्रेचे बांदा शहरात शनिवारी आगमन…!

प्रकाशन: 04 Nov 2022 10:41 AM
वाचन संख्या 37

बांदा | राकेश परब :
श्री रामराज्य रथयात्रेचे बांदा शहरात शनिवार दिनांक ५ रोजी सकाळी ९ वाजता आगमन होणार असल्याने या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथून ही यात्रा गोव्यात रवाना होणार आहे.
रथयात्रेचे नियोजन करण्यासाठी आज सायंकाळी उशिरा येथील श्री भूमिका मंदिरात बैठक संपन्न झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, जिल्हा प्रचार प्रमुख सुनील सावंत, प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, बजरंग दल कार्यकर्ते अमित बांदेकर, रोहन बांदेकर, देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, राकेश परब, ज्ञानेश्वर सावंत, भूषण सावंत, रत्नाकर आगलावे, अवंती पंडित, अरुणा मोर्ये, बाबल मोर्ये आदी उपस्थित होते.सकाळी ९ वाजता मुंबई गोवा महामार्गावर ओवेस कॉम्प्लेक्स येथे रथाचे स्वागत होणार आहे. अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिराची प्रतिकृती रथात उभारण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष राम मंदिराचे दर्शन घडणार आहे. रथात श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन देखील भाविकांना घेता येणार आहे. दर्शन कार्यक्रम झाल्यानंतर रथ गोवा म्हापसा येथे मार्गस्थ होणार आहे. या रथ यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री रामांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स