श्रावण रवळनाथ मंदिर येथे हरिनाम सप्ताह…!
श्रावण | गणेश चव्हाण : मालवण तालुक्यातील रवळनाथ मंदिर श्रावण येथे प्रतिवर्षाप्रमाणे सप्त प्रहराचा हरिनाम सप्ताह शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबरला समस्त वारकरी भजनी मेळाव्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या सप्ताहासाठी दशक्रोषितील सर्व भजनी मंडळानी, दिंडी भजनासह उपस्थित रहावे, असे आवाहन श्रावण गाव प्रमुख दुलाजी परब यांनी केले आहे.
श्रावण रवळनाथ मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे हरिनाम सप्ताह, मुंबईकर चाकरमानी स्थानिक ग्रामस्थ आणि माहेरवाशीनी यांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. या सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने श्री लिंगेश्वर रवळनाथ देवस्थान समिती श्रावण यांनी केले आहे.
सकाळी १० वाजता ब्राम्हणांच्या हस्ते विधीवत पुजा अर्चा करुन घटस्थापने पासून सुरुवात होणार. यानंतर सकाळी ११वाजता पासून वारकरी दिंडी भजणांस प्रारंभ. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत हा सप्ताह अखंडपणे टाळ मृदंगाच्या गजरात धार्मिक भजनातून समाज प्रभोधन करत सुरु असतो. या सप्ताहाला परिसरातील निमंत्रीत दिंडी भजनी मंडळांनी, व रसिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान देवस्थान मंडळाच्या वतीने गांव प्रमुख दुलाजी परब यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)