बांद्यात आज श्री विठोबाची जत्रा…!
बांदा | राकेश परब :
बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरचा प्रतिवार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात पहाटे पाच वाजता श्रींच्या काकडआऱतीने सोहळ्यास प्रारंभ होईल.त्यानंतर दर्शन व तीर्थप्रसादास आरंभ होईल. सायंकाळी ४ वाजता उत्सवमुर्तीचे आगमन होईल.सायंकाळी ५ ते ७स्थानिक महिलांची भजनसेवा होईल. ७ वाजता सायंआरती होईल .९ वाजता मंदिराभोवती श्रींचा पालखी प्रदक्षिणा सोहळा होईल. या जत्रोत्सवा निमित्त आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)