ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किंजवडे श्री देव स्थानेश्वर मंदिरात आजपासून कार्तिकोत्सव....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किंजवडे श्री देव स्थानेश्वर मंदिरात आजपासून कार्तिकोत्सव....!

प्रकाशन: 03 Nov 2022 12:58 PM
वाचन संख्या 30

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील किंजवडे गावचे जागृत ग्रामदैवत इनामदार श्री देव स्थानेश्वर मंदिरात दिनांक ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.लळीत कार्यक्रमाने ८ नोव्हेंबरला उत्सवाची सांगता होणार आहे.
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुण्याहवाचन, काकड आरती,रात्री ९ वाजता शिवकळा, पुराण, महाआरती, पालखी सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता जामसंडे येथील ह.भ.प. मधुकर गोगटे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ नोव्हें. रोजी रात्री ९.३० वाजता तुलसी विवाह, ११.३० वाजता कणकवली येथील ह.भ.प. पुरुषोत्तम काजरेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. ६ नोव्हे. रोजी रात्री ११ वाजता किंजवडे देऊळवाडी येथील श्री देव स्थानेश्र्वर प्रासादिक नाट्यमंडळाचा शुक्राचार्य मायासंग्राम हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. ७ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता नाडण येथील माऊली प्रासादिक भजन मंडळ बुवा कीर्ती पुजारे यांचे संगीत भजन, रात्री ११.३० वाजता त्रिपुरारोत्सव, शिवकळा, आरती, पालखी सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. ८ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता घाडीपाडावेवाडी येथील नवदुर्गा नवतरुण नाट्यमंडळाचा कलांतक मर्दिनी हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग व कीर्तनानंतर लळीत कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.
कर्तिकोस्त्वाच्या कालावधीत मंदिरात दररोज सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता सनई वादन, गायन बैठक, रात्री ९ वाजता पुराण, महाआरती, श्रींचा पालखी सोहळा, सनई वादन, पहाटे काकड आरती आदी कार्यक्रम दररोज नित्यनेमाने होणार आहेत.
कार्तिकोत्सवास भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन किंजवडे, बारा-पाच मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स