ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन...!

प्रकाशन: 02 Nov 2022 01:04 PM
वाचन संख्या 118

मसुरे | प्रतिनिधी :
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, छात्रशक्ती आणि तांडव थिएटर निर्मित, श्रीमती कमल वसंत जाधव खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२२-२३. १० डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी२०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ५० हजार रुपये, ३० हजार रुपये, २० हजार रुपये तर उतेजनार्थ दोन संघाना १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. शिवाय रोख रक्कमेची वैयक्तिक पारितोषिके ही आहेत.सदर स्पर्धा खालील केंद्रांवर आयोजित केली आहे.
पुणे येथे १० डिसेंबर, अहमदनगर ११ डिसेंबर, कणकवली १८ डिसेंबर, नाशिक २५ डिसेंबर तर मुंबई ८ जानेवारी २०२३ रोजी स्पर्धा रंगणार आहे. अंतिम फेरी १४ जानेवारी २०२३ रोजी अत्रे रंगमंदिर कल्याण येथे होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. अधिक माहिती साठी राजेश कदम ( ९४२३८३२६९२), आनंद तांबे ( ९६८९१४४६२८),
सुभाष कदम(9226301373) विशाल हडकर ( 919049813916 ) , नरेंद्र तांबे (७५८८५८४७९३) यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स