मालवण गांवकर वाड्यातील श्री. शिदीया देवालय परिसर प्रकाशमय.
माजी नगरसेविका तृप्ती मयेकर व माजी नगरसेविका सेजल परब यांच्या प्रयत्नाला यश…!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे गेली अनेक वर्षे जागृत श्री शिदीया देवालय परिसरात गांवकर वाडा मधील नागरिकांची मागणी होती की या भागात लाइट ची तथा योग्य प्रकाश व्यवस्था करावी. या देवालयात देवाचे जे कार्यक्रम होतात ते गेली अनेक वर्षे काळोखात होत होते आणि त्यासाठी लाईटची अडचण निर्माण होत होती.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या परिसरात मिनी हायमास्ट लाइट उभारणात आली आणि यासाठी मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या सहकार्याने हे काम करण्यात आले आहे.
माजी नगरसेविका तृप्ती मयेकर व माजी नगरसेविका सेजल परब यांच्या प्रयत्नांना यश आल्याने परिसरातील नागरिकांनी आभार व समाधान व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)