किसान मोर्चाचे शिष्टमंडळ घेणार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या वेतोरे व शिरोडा महसूल मंडळातील गावातील शेतकर्यांना फळपीक विम्याची उर्वरित रक्कम अर्थात् पर्जन्य बाधीतची रक्कम प्राप्त झाली असून तापमान बाधीत विम्याची रक्कम देय आहे ती अद्यापही न मिळाल्याने भाजपा किसान मोर्चाच्या वतीने त्या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे दिपक नाईक व संतोष शेटकर यांनी सांगितले.
वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, नगरसेवक व प्रगतशील शेतकरी प्रशांत आपटे उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा महसूल मंडळांमध्ये शिरोडा, गांधीनगर, रेडी, कनयाळ, आरवली, सागरतीर्थ ही गावे येतात तसेच वेतोरे मंडळांमध्ये वेतोरे, पालकरवाडी, केळुस, खानोली, वायंगणी, दाभोली, आडेली, कांबळेवीर, वजराठ ही गावे सामाविष्ट असुन सदर गावातील लोकांना अद्याप पर्यंत पिकविम्याची रक्कम मिळाली नाही. नियमाप्रमाणे पंचेचाळीस दिवसांनंतर सदर रक्कम व्याजासह देणे क्रमप्राप्त आहे. यासाठीच भाजपा किसान मोर्चा च्या वतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती ची माहिती दिली जाणार आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने चेअरमन मनिष दळवी यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलायन्स इनश्युरन्स कंपनी घ्या अधिकार्यांना सोबत या विषयावर बैठक आयोजित केली आहे, त्याठिकाणीही भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)