ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नट वाचनालयात १९ नोव्हेंबरला कथाकथन स्पर्धा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नट वाचनालयात १९ नोव्हेंबरला कथाकथन स्पर्धा.

प्रकाशन: 01 Nov 2022 05:17 PM
वाचन संख्या 26

बांदा | राकेश परब : बांदा येथील नट वाचनालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विष्णु नारायण गांवकर आडाळी पुरस्कृत (कै.) सौ . विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक १९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता नट वाचनालयात होणार आहे.सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इयत्ता .३ री व ४ थी आणि इयत्ता .५ वी ते ७ वी अशा दोन शालेय गटात होणार आहे. इयत्ता . ३ री व ४ थी या गटासाठी ‘साने गुरुजींची कथा’ हा विषय असून वेळ ३ मिनीटे आणि इ .५ वी ते ७ वी गटासाठी ‘थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग’ हा विषय असून वेळ ४ मिनीटे देण्यात आला आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्विकारले जातील. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल प्रमिला नाईक (मो. ९४०५५७०३४९) यांच्याशी संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स