ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओरोसच्या गुरुकुल ॲकॅडमीतर्फे पोलीस भरती मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओरोसच्या गुरुकुल ॲकॅडमीतर्फे पोलीस भरती मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

प्रकाशन: 01 Nov 2022 03:25 PM
वाचन संख्या 92

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : पोलिस भरतीत जाण्याची इच्छा बाळगणार्‍या आणि कठोर प्रयत्न करण्याची तयारी असणार्‍या तरुण-तरुणींना मार्गदर्शन मिळतच नाही म्हणून अनेक जणांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते. त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची ही गरज ओळखून ओरोस येथील गुरुकुल करिअर ॲकडमी ,ओरोस या जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचे अग्रगण्य मार्गदर्शन करणार्‍या संस्थेमार्फत ६ नोव्हेंबर २०२२ला एक दिवशीय मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवसीय पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरामध्ये तरुण-तरूणींसाठी विषय लेक्चर,कागदपत्र मार्गदर्शन,कमी कालावधीत यशस्वी होण्याचे मार्ग तसेच १०० गुणांची लेखी परीक्षा व प्रश्नपत्रिका विश्लेषण पूर्णतः मोफत आयोजित करण्यात आले आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणींना हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.याचा जास्तीत जास्त तरुण आणि तरुणींनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल अकॅडमीकडून करण्यात आले आहे.या प्रशिक्षण शिबीरात ५ नोव्हेंबर २०२२ पर्यत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
यासाठी ७२६४९२००६२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुरुकुल अकॅडमीकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स