श्री.देव खरोबा युवक कला - क्रीडा मंडळ, नाटेलीवाडी - मातोंड आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.
शिबिराला मिळाला उत्तम प्रतिसाद.
भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केली सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान व आयोजकांची विशेष प्रशंसा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री.देव खरोबा युवक कला – क्रीडा मंडळ, नाटेलीवाडी – मातोंड आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – शाखा – वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एस्.एस् .पी.एम .लाईफटाईम हाॅस्पीटल,पडवे यांच्या सहकार्याने श्री.देव रवळनाथ सभागृह, मातोऺड विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर म्हणून मातो॑ड सरपंच जान्हवी परब, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी महिला मोर्चा अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, ता.उपाध्यक्ष संतोष गावडे, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री, किशोर परब, लाईफ टाईम हाॅस्पीटलचे मनीष यादव, बुथ प्रमुख हर्षल परब व शेखर परब, वर्षा कुडाळकर, तुकाराम परब देवा कांबळी, श्रीकांत परब, सचीन कोऺडये, नितीन परब ( तळवडेकर ) सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेऺडोऺलकर, ता.अध्यक्ष अलिस्टर ब्रीटो, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, संजय पिळणकर ( सावंतवाडी – दोडामार्ग विभाग प्रमुख ) बाबली गवंडे ( सावंतवाडी या.सचिव ) इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसन्ना देसाई यांनी श्री.देव खरोबा युवक कला व क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे रक्तदाना सारखा सेवाभावी उपक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच संपूर्ण सिऺधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ उभी केल्याबद्दल सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.
मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केले. रक्तदान कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै.सनी रेडकर व मातो॑डचे माजी सरपंच कै.उमेश परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी श्री. खरोबा युवक कला क्रिडा मंडळ मातोंड नाटेलीवाडी चे कार्यकर्ते संजय केणी, प्रथमेश नाईक, प्रसाद नाईक, ओमकार कोरगावकर, निखिल वैद्य,अमर जबडे, नारायण केणी, सुनिल जबडे, पलाश वैद्य, दिपेश नाईक, शुभम नाईक, यशवंत (भाऊ) केळजी, विशाल बागायतकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)