कणकवलीतील सार्वजनीक बांधकाम उपअभियंता गणेश कर्वे यांचे अकाली निधन.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते.
गेला काही काळ गणेश कर्वे त्यांना पोट विकाराचा त्रास होता व त्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले.
दिवंगत कर्वे हे मूळ फलटण येथील होते व काही वर्षांपासून सातारा येथे स्थायिक झाले होते.
वर्षभरापूर्वी कणकवलीचे उपअभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच वेगळी कार्यपद्धती ठेवून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा येथे रवाना झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अकाली निर्णयाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)