बालिकेने चुकून प्यायले राॅकेल पण सुदैवाने अनर्थ टळला…!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील पिसेकामते कदमवाडी येथील एका बालिकेने खेळत असताना पाणी समजून घरात बाजूला असलेल्या बाटलीतील रॉकेल प्यायल्याची घटना घडली. नंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर असून धोका टाळल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्या दीड वर्षीय बालिकेने पाणी समजून चुकून घरातील बाटलीतील रॉकेल तोंडात ओतले. घरच्यांना हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करता दाखल केले व अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेळेतच ही गोष्ट घरच्यांनी हेरल्यामुळे अनर्थ टळला असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)