ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार प्रदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 01 Nov 2022 10:20 AM
वाचन संख्या 66

सदैव साहित्याशी जोडून असलेल्या सिंधुदुर्ग पुत्राची होते आहे सर्व स्तरातून प्रशंसा.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तथा कोकणातील क्रियाशील साहित्यिक आणि दापोली येथील उपक्रमशील शिक्षक श्री. बाबू घाडीगांवकर गांवकर यांना काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेचा सन २०२२ या वर्षासाठीचा ‘ काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार ‘ नुकताच सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.


गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या बाबू घाडीगांवकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

सोलापूर येथील इंडियन माॅडेल स्कूल च्या ए.डी. जोशी सभागृहात नुकताच काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेचा १२ वा राज्यस्तरीय काव्योत्सव सोहळा पार पडला. या काव्योत्सवात राज्यभरातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला होता. या समारोहात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व कोकणातील प्रथितयश साहित्यिक असलेल्या बाबू घाडीगांवकर यांचा काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख राजेंद्र दासरी यांचे हस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्यसचिव कालिदास चवडेकर, ज्येष्ठ कवी व गीतकार राष्ट्रपाल सावंत, काव्यगुरु विजय जोशी, विद्यालयाचे माजी प्राचार्य ए.डी. जोशी, संदीप वाघोले, जया नेरे, पत्रकार भरतकुमार मोरे, काव्यप्रेमीचे कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, सोलापूर शहराध्यक्ष महेश रायखेलकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष युवराज जगताप, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिशय किशोर वयात पत्रकार म्हणून नावाजले गेलेले आणि कोकणातील विविध दैनिके, व दिवाळी अंकांमधून बाबू घाडीगांवकर यांचे साहित्य नियमित प्रसिद्ध होत असते. त्यांचा ‘ बाबा ‘ हा कवितासंग्रह तर ‘ वणवा ‘ हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स