ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण संस्थेच्या ११ व्या वर्धापनादिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण संस्थेच्या ११ व्या वर्धापनादिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न…!

प्रकाशन: 31 Oct 2022 08:51 PM
वाचन संख्या 50

बांदा | राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक,अनाथ आश्रम, महिला सक्षमीकरण, अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम करण्यात येतात. संस्थेच्या ११व्या वर्धापनदिनानीमित्त ३० ऑक्टोबरला रॅम्प वॉक, आदिवासी नृत्य कला, डान्स स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच स्पर्धामध्ये स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दिवाळी पहाटच्या वेळी वर्धापन दिनानिमित्त पुणे श्रीलोचन आश्रमात लहान मुलांचा दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Article image

कुमार प्रज्वल कुबल याने गायन आणि हार्मोनियम व तबला साथ दिली. श्रीलोचन आश्रमातील सनाथ मुलांनी याचा आस्वाद घेतला. काशिनाथ धुरू हॉल, दादर,मुंबई येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे स्नेहल मोरे, श्रेया राणे, रामचंद्र पाटील आणि विलोकीता पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर बक्षीस वितरण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सुरज कदम,प्रीती पांगे, जयश्री खोपकर, हर्षला अमूप, नेहा वाकोडे, दर्शन कांबळे, सचिन धोपट, रामचंद्र पाटील, श्वेता सावंत, सिंड्रेला जोसेफ, बापू माने,तारा सांगळे, योगिता निजामकर, फरहान शेख, बिना अहिरे, सुनंदा मोरे, ऋतुजा पवार, मृणाल गायकवाड, नागेश पवार, राहुल शिंदे, साक्षी पोटे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ओवळे आणि सलिना बुटेलो यांनी तर आभार स्वाती नलावडे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स