ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शैलेश लाड मित्रमंडळाच्या वतीने कोंडूरा येथील श्री माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळेत कार्यक्रमाचे आयोजन…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शैलेश लाड मित्रमंडळाच्या वतीने कोंडूरा येथील श्री माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळेत कार्यक्रमाचे आयोजन…!

प्रकाशन: 31 Oct 2022 08:43 PM
वाचन संख्या 44

बांदा | राकेश परब :
शरीराने मतिमंद, कर्णबधिर असली तरी ही मुले आपल्या समाजाचाच एक भाग असून कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसतानाही या मुलांची माणुसकीच्या भावनेतून सुश्रुषा करणे हे कौतुकास्पद आहे. भविष्यात या मुलांसाठी व शाळेच्या भौतिक गरजासाठी आम्ही निश्चितच मदत करू अशी ग्वाही उद्योजक शैलेश लाड यांनी कोंडूरा येथे दिली. शैलेश लाड मित्रमंडळाच्या वतीने कोंडूरा येथील श्री माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळेत आयोजित कार्यक्रमात श्री लाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार निलेश मोरजकर, अभिनेते गुणेश गवस, इन्सुली प्राथमिक शाळेचे उपशिक्षक हंसराज गवळे, कर सल्लागार समीर परब आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत मुलांनी केले. यावेळी मान्यवरांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला .निलेश मोरजकर म्हणाले की, समाजाने देखील या मुलांसाठी काहीतरी करण्याचे ध्येय बाळगावे. या मुलांना देखील समाजात हक्काने जगण्याचा अधिकार असून यासाठी लाड मित्रमंडळाच्या वतीने भविष्यात मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गुणेश गवस यांनी या मुलांची सुश्रुषा करणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुक केले. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक प्राणेश नाईक, नंदिनी आचरेकर, सरोज चव्हाण, संगीता उकरंडे, शिक्षकेतर कर्मचारी गंगाराम शेळके, नंदा सावंत, सविता मोरजकर, दीपाली कदम, नम्रता सावंत, गोकुळ कवठणकर, रामचंद्र गोडकर आदी उपस्थित होते. आभार गंगाराम शेळके यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स