ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जनहीतासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार : सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जनहीतासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार : सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे.

प्रकाशन: 31 Oct 2022 08:37 PM
वाचन संख्या 253

नवलराज काळे यांच्या मागणीला यश.

ग्रामपंचायत सडूरे शिराळे स्वच्छतागृह बांधकामाचे प्रभारी सरपंच संतोष पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन..

Article image

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या ग्रामपंचायत सडूरे शिराळे स्वच्छतागृह बांधकामाचा भूमीपूजन पूजन सोहळा संपन्न झाला ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संतोष पाटील यांच्या शुभहस्ते व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आज संपन्न झाला. ग्रामपंचायत नूतन इमारत झाल्यानंतर स्वच्छतागृह व्हावे अशी मागणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी केली होती.या संदर्भात काळे यांनी वारंवार पाठपुरावा करून सदर काम मंजूर करण्यास यशस्वी प्रयत्न केला. काळे यांनी केलेली मागणी व केलेला पाठपुरावा यशस्वी झाल्यामुळे नूतन इमारतीच्या लगतच सुसज्य असे स्वच्छतागृह बांधकाम होणार आहे या स्वच्छतागृहाचा ग्रामपंचायत कार्यालयीन व सार्वजनिक वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. रस्ता,पाणी,आरोग्य,शिक्षण हे चार मुद्दे डोळ्यासमोर ठेवून गेले पाच वर्ष गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे आणि त्यांच्या सोबत असलेली सर्व कार्यकारणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे त्यातच सार्वजनिक स्वच्छता गृह उभारून स्वच्छ भारत अभियानांतर्गत चालू असलेल्या उपक्रमास शोभेल असे काम ग्रामपंचायत कार्यकारणी करीत आहे. ग्रामपंचायत स्वच्छतागृह नंतर तांबळघाटी जिल्हा परिषद शाळा येथे देखील स्वच्छतागृहाचे काम करण्यात येणार आहे यासाठी देखील ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी जनतेच्या वतीने मागणी केली होती व ती मागणी देखील पूर्ण झाली आहे.

Article image

पाणी,रस्ता,शिक्षण,आरोग्य या विविध कामाबाबत एक ध्येय ठेवून पाच वर्षे काम पाहिलेच जनतेने पुन्हा एकदा ग्रामपंचायत मध्ये आमच्या विचारांची कार्यकारणी बसवल्यास येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या सहकार्यातून गावातील गणपती घाट,स्मशानभूमी, संपूर्ण गावात स्ट्रीट लाईट, उर्वरित रस्ते कामे यांसारखे अनेक जनहिताचे उपक्रम राबवून गावाला विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पुन्हा देखील करू असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी केले. काळे यांना प्रत्येक कार्यात साथ करणाऱ्या सरपंच सदस्य व ग्रामसेवक प्रशांत जाधव तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील सर्व जनतेचे नवलराज काळे यांनी आभार . या उद्घाटन सोहळ्याला गावचे प्रभारी सरपंच संतोष पाटील, वैभववाडी तालुका अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी मारुती मोहिते,ग्रामसेवक प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या आकांशा जंगम,लक्ष्मीबाई बोडेकर, अक्षय मोहिते, माजी उपसरपंच वैशाली सावंत,मालती रावराणे,श्रीमती रहाटे, लाडकोजी पवार, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, पाणी पुरवठा कर्मचारी अशोक पाटील, डाटा ऑपरेटर रुपाली रावराणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स