ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कनेडी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सतीश सावंत बिनविरोध..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कनेडी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सतीश सावंत बिनविरोध..!

प्रकाशन: 31 Oct 2022 01:44 PM
वाचन संख्या 50

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेची सलग चौथी निवडणूक बिनविरोध झाली. या संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. दर्जेदार शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण ही संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत असे मत सतीश सावंत यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केले .
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच मुंबई येथे घेण्यात आली होती. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मुंबई येथे झाली. तत्पूर्वी संस्थेच्या माध्यमातून पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी सतीश सावंत , उपाध्यक्षपदी प्रभाकर सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत तर खजिनदार पदी प्रकाश सावंत यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारणी संचालक म्हणून डॉ. प्रदीप सावंत, सुधीर सावंत, संजय लवु सावंत, रत्नाकर सावंत, संजय दामोदर सावंत, संदेश सावंत, नागेश सावंत, दत्तात्रय सावंत, जयप्रकाश सावंत , जयवंत सावंत, व्ही. बी. सावंत यांची निवड झाली आहे. संस्थेच्या कायदेशिर सल्लागार सदस्य पदी ॲड. जगदीश सावंत,ॲड. मिलिंद मोहन सावंत, ॲड. सोनल सावंत-परब, अंतर्गत हिशेब तपासणीस रविंदर पुंडलिक सावंत आणि गितेश वळंजू, सल्लागार सदस्य विलास भास्कर सावंत यांची निवड झाली आहे.

संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना सतीश सावंत म्हणाले, कनेडी शिक्षण संस्थेची प्रगती ही दिवसेंदिवस होत आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून विज्ञान शाखेला अनुदान मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेतून शिक्षण घेणे सोपे झाले आहे. कनेडी शिक्षण संस्थेने ची स्थापना १९५३ साली झाली. त्यानंतर आमच्या संचालक मंडळाने कारभार हातात घेतल्यानंतर संस्थेमध्ये विविध प्रकारची प्रगती झाली आहे. शैक्षणिक संकुलन दर्जेदार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले आहे. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळणार आहे. अत्यंत दर्जेदार अशी ही अटल लॅब तयार करण्यात आली आहे प्राथमिक ते उच्च माध्यमिक दर्जेदार शिक्षण देण्यात साठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सावंत म्हणाले. कणेरी शिक्षण संस्थेचा दहावी बारावीचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागत आहे मात्र यापुढे संस्थेचा निकाल गुणवत्तापूर्वक लागावा प्रत्येक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असताना त्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी व अन्य उच्च शिक्षण घेण्यासाठी पूरक असे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आगामी काळामध्ये नीट, जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थीही पुढे यायला हवेत असे नियोजन संस्थेने केले आहे शिक्षण संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षणाबरोबर उत्कृष्ट असे खेळाडूही तयार होत आहेत कॅरम स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरही आमच्या संस्थेचे विद्यार्थी खेळत आहेत शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी प्रगती करत आहेत संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत यावर्षी अटल टीकरिंग लॅब आणि दर्जेदार व्यायाम शाळा ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. खास. विनायक राऊत यांच्या माध्यमातून अटल टिकरिंग लॅब मंजूर झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होईल असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स