ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली पटकीदेवी ते नागवे रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली पटकीदेवी ते नागवे रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू.

प्रकाशन: 31 Oct 2022 12:38 PM
वाचन संख्या 48

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या पटकीदेवी ते नागवे रोडची दुरावस्था झाल्याने त्रिपुरारी पौर्णिमे पूर्वी हे काम तात्काळ करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपच्या वतीने देण्यात आल्यानंतर त्याची गांभीर्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेतली. तसेच याबाबत तातडीने कार्यकारी अभियंत्यांना सूचना देत पटकीदेवी ते स्वयंभू मंदिर पर्यंतच्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात आले.

Article image

कणकवली शहर भाजपाच्या वतीने चार दिवसांपूर्वी पटकीदेवी ते नागवे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत उपकार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर हे काम मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी आम्हाला मंजुरीचे आदेश नकोत. तर प्रत्यक्षात काम केव्हा करणार ते सांगा. त्रिपुरारी पौर्णिमे पूर्वी पटकी देवी ते स्वयंभू मंदिर पर्यंत चे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला होता. भाजपचे किशोर राणे, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांचे देखील लक्ष वेधले होते. तर आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सदर कामाबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार लगेचच आज सोमवारपासून या कामाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. याबद्दल भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कार्यकारी अभियंत्यांचे देखील लक्ष वेधले होते. नरडवे रोडवरील खड्डे देखील तातडीने बुजवा अशा अशी मागणी नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी केली होती. त्यावर येत्या आठ दिवसात नरडवे रोडवरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन कार्यकारी अभियत्यांनी दिल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स