ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले भाजपच्या वतीने धान्य वितरण मुदतवाढीसाठी तहसीलदारांकडे मागणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले भाजपच्या वतीने धान्य वितरण मुदतवाढीसाठी तहसीलदारांकडे मागणी.

प्रकाशन: 31 Oct 2022 05:11 PM
वाचन संख्या 63

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण वेऺगुर्ले तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पाॅज मशिन चालत नसल्याने नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. रास्त धान्य दुकानावर फेर्या मारुन गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे आणि ३१ तारीख महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी ६०% लोकांना अजूनही धान्य मिळाले नाही ही जनसामान्यांची अडचण लक्षात घेऊन भाजपा शिष्टमंडळाने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार वेऺगुर्ले यांची भेट घेतली. तसेच धान्य वितरणासाठी आठ दिवसाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली. तसेच आगामी दौऱ्यात नाम.रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन धान्य वितरणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी भाजपा मार्फत पाठपुरावा करणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक, विश्वनाथ परब, गोविंद परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स