गडनदीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली.
कणकवली | प्रतिनिधी : आज सकाळी कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या जवळ केटी बंधाऱ्याच्या वरील भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आज सकाळी आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, चंद्रकांत माने, मंगेश बावधने, किरण मेथे, सचिन माने यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
मात्र त्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. मात्र सदर व्यक्ती ही साधारणतः ५० वर्षाची असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत होते. वर्णनानुसार राखाडी कलरची ट्रॅक पॅन्ट व मरून कलरचा फुल हाताचा शर्ट असा त्या व्यक्तीचा पेहराव होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला व सदर व्यक्ती कोण त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. केवळ काही मिनिटातच त्या मृतदेहाबाबत माहिती पोलिसांना मिळाली. सध्या रा. कणकवली बिजलीनगर, मूळ – ओसरगाव येथील रविदास तुकाराम चौकेकर (वय ५०) यांचा असल्याचे समजले. मयत रविदास चौकेकर हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सफाईगार या पदावर निवृत्त झाले होते. २०१६ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)