हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग साफसफाई मोहीम.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने बुधवारी २ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता किल्ले सिंधुदुर्ग साफसफाई मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक, गड किल्ले प्रेमी व समाज सेवी संस्थांनी या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना मालवण शहर प्रमुख बाबी जोगी व युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)