गडनदी पात्रात सापडला अनोळखी मृतदेह.
वागदे के.टी. बंधारा येथील घटना ; कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या जवळ केटी बंधाऱ्याच्या वरील भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आज सकाळी आढळून आला आहे.
या घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस चंद्रकांत माने, मंगेश बावधने, यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. साधारणता ४५ ते ५० वर्षीय असलेली ही व्यक्ती गुडघाभर पाण्यामध्ये बुडलेल्या स्थितीत काहींना आढळून आली. त्यानंतर पोलिसांना माहिती देताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. राखाडी कलरची ट्रॅक पॅन्ट व मरून कलरचा फुल हाताचा शर्ट असा त्या व्यक्तीचा पेहराव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सदर मृतदेह नदीपात्रातून स्थानिकांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला असून त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)