ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मूळ मडुरे गांवच्या राजाराम परब यांचे डोंबिवलीत निधन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मूळ मडुरे गांवच्या राजाराम परब यांचे डोंबिवलीत निधन.

प्रकाशन: 31 Oct 2022 10:48 AM
वाचन संख्या 50

समाजसेवक व माजी शिवसेना शाखा प्रमुख गजानन परब यांचे ते वडिल होत.

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरे येथील रहिवासी कै. राजाराम सखाराम (पांडुरंग) परब यांचे २६ ऑक्टोबरला सकाळी ८:४० वाजता त्यांच्या डोंबिवली- ठाणे येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी
१९५७ पासून ते १९९३ पर्यंत त्यांनी पश्चिम रेल्वेत सेवा बजावली. विनाअपघात सेवा स्पेशल “ए ग्रेड सर्टीफाईड” ,गोल्ड मेडल विनर म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. पश्चिम रेल्वेत रुजू होताना एक फायरमन म्हणून स्टीम इंजिन ते ईलेक्ट्रीक एसीडीसी ईंजन पायलट म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी रेल्वेची अथक अविरत सचोटीने सेवा बजावली.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे व एक मुलगी व नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्व सामाजिक स्तरावरुन दु:ख व्यक्त होत आहे. समाज सेवक व माजी शिवसेना शाखा प्रमुख गजानन परब यांचे ते वडिल होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स