वैभववाडी तालुक्यात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई..
वैभववाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या कोळपे येथे राजरोस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर वैभववाडी पोलीसांनी छापा टाकला. पोलीसांनी जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले असुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कोळपे परिसरात खळबळ माजली आहे.
कोळपे जमातवाडी येथे जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस शिपाई कृष्णांत पडवळ, अजय बिलपे, कुंडलिंक वानोळे, अमोल जाधव जुगार अड्ड्यावर छापा मारण्यासाठी कोळपे जमातवाडी येथे पोहोचले. जमातवाडी येथील एका सागवानाच्या झाडाखालील व्हाळाच्या शेजारी काही लोक जुगार खेळत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या अड्डयावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले. सर्वावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच जुगार खेळण्यासाठी असलेले साहीत्य आणि २ हजार ९०० रूपये देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
पोलीसांनी अकरा जणांवर कारवाई केली. तालुक्यात पोलिसांनी अवैध धंद्याबाबत अशीच कडक मोहीम राबवावी, अशी सध्या नागरिकांतून मागणी होत असल्याचे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)