ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तांबळडेग येथे मुक्तद्वार सागर वाचनालयाचा ९४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तांबळडेग येथे मुक्तद्वार सागर वाचनालयाचा ९४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

प्रकाशन: 30 Oct 2022 10:07 PM
वाचन संख्या 78

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
देवगड तालुक्यातील “ब दर्जा” प्राप्त आदर्श ग्रंथालय असलेल्या मुक्तद्वार सागर वाचनालय तांबळडेग (रजि.) या ग्रंथालयाचा ९४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निवतकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्यव्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम, दत्ता नावगे, वामन मोंडकर, पांडुग कोंळबकर, शंकर भाबल, सुभान कोंळबकर, ग्रंथालय अध्यक्ष दिगंबर येरागी, उपाध्यक्ष प्रभाकर राजम, सरचिटणीस रश्मी कांदळगावकर, विलास सनये, अंतर्गत हिशोब तपासणीस विष्णू धावडे,सुलोचना नरेंद्र राजम आदी
मंचावर उपस्थित होते.
गावातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनात्मक खेळ पार पडले यामध्ये हर्षिदा शिवचंद्र धुरी, आर्यन मोहनदास प्रभू, मंत्रा नितिन कोळंबकर आदींनी यश मिळविले त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,
यावेळी स्वरसंध्या गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये रत्नाकर राजम, नितीन कोळंबकर, श्रीकृष्ण राजम, प्रभाकर राजम, रश्मी कांदळगावकर, पद्माकर राजम, ओंकार सारंग आदींनी सहभाग घेतला होता.ग्रंथालय परिसरात विद्युत रोषणाईसह, समृद्धी धुरी, माधवी प्रभू, आकांक्षा सारंग, तृप्ती कोंळबकर यांनी काढलेल्या रांगोळी सह दीप प्रज्वलित केल्याने ग्रंथालय परिसर उजळून निघाला होता. मंत्रा नितिन कोळंबकर हिने नृत्य सादरीकरण केले.
यावेळी रवींद्र कांदळगावकर, मधुकर कुमठेकर, गंगाराम निवतकर, मनोहर केळुसकर, चंद्रशेखर उपाणेकर, विशाल कोंळबकर, राजेंद्र येरागी, प्रफुल्ल वेंगुर्लेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विष्णू धावडे यांनी केले तर आभार विलास सनये यांनी व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स