ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देशभरात आता ' एक पोलिस, एक गणवेश '? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना आवाहन…!

देशभरात आता ' एक पोलिस, एक गणवेश '? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना आवाहन…!

प्रकाशन: 29 Oct 2022 02:26 PM
वाचन संख्या 42

मुंबई | ब्यूरो न्यूज :
देशभरातील पोलिस व्यवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची सूचना केली आहे. त्यानुसार ‘एक देश, एक पोलिस, एक गणवेश’ ही व्यवस्था आणण्याबाबत राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पोलिस हा राज्यसूची अतंर्गत असणारा प्रश्न आहे. त्यामुळं प्रत्येक राज्यानं आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश डिझाईन केलेला आहे. मात्र, ‘एक देश, एक पोलिस, एक गणवेश’ या संकल्पनेवर चर्चा सुरु व्हावी, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, या व्यवस्थेचे फायदे देखील पंतप्रधानांनी सांगितले आहेत. ते म्हणाले, एकतर गणवेशासाठी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गणवेशाचं कापड तयार होणार असल्यानं ते दर्जेदार असेल. त्याचबरोबर कॅप, बेल्ट यासाठी एकाच वेळी मोठी मागणी असेल. देशातील कोणताही नागरिक कोणत्याही भागात जाईल तेव्हा त्याला कळेल की, हा पोलिसवाला आहे. त्यामुळं ‘एक पोलिस, एक गणवेश’ ही संकल्पना महत्वाची आहे. फक्त त्यांच्या गणवेशावर संबंधित राज्याचा टॅग किंवा नबंर असू शकतो, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स